नागानंद
१९३५

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/११७१८ फूट/१३१ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १४२३४/४-२-३५

निर्मिती संस्था :सम्राट सिनेटोन
दिग्दर्शक :वाय.व्ही.राव
कथा :राजा श्रीहर्ष यांचे संस्कृत नाटक
पटकथा :वाय.व्ही.राव
संवाद :एस्.एच्.ठाणेकर
संगीत :वामन सडोलीकर
छायालेखन :काशीनाथ बावडेकर
गीतलेखन :एस्.एच्.ठाणेकर
कला :बी.के.जोशी, आळंदीकर
ध्वनिमुद्रक :आर.एन.बांदिवडेकर
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :आझमबाई, आर्. एन्. चितळकर (सी.रामचंद्र), वामनराव सडोलीकर, एकनाथ पारगांवकर, एस्. एच्. ठाणेकर, गायकवाड
गीते :१) अहिप्राण हरता, २) भक्ता सुखवाया, ३) सुखद सूर सभा, ४) तव पदा देह मम अर्पाया, ५) लाऊन वेड जीवाला गेला, ६) धुंदी मनाची, ७) झाली मजा अनावर, ८) दिन ऐसा सुखाचा, ९) सुदिन उगवला प्रभुचि दया, १०) चरणी शरण सतत, ११) अहा पुण्य शीला, १२) सकल सुखद पुरली, १३) सुखकाल असा लाभला.
कथासूत्र :विष्णुवाहन गरुडावर नागवासियांचा अतिशय विश्वास!त्यामुळे त्याची नियमित प्रार्थना करणे आणि त्याला दररोज एका माणसाचा बळी देणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम.जीमुथकेतूनचा मुलगा जीमुथावन याने आपल्या राज्याचा त्याग करून राजकन्या मलयावतीशी विवाह केला.एक दिवस जीमुथावनने एका बाईच्या एकुलत्या एका मुलाचे प्राण वाचविण्यासाठी गरुडाला स्वतःचा बळी अर्पण केला.गरुडाने त्याला खाल्ले आणि नंतर त्याला आपली चूक कळून आली.लगेच त्याने अमृत आणून जीमुथावनला जीवदान दिले.
विशेष :यांतील नायकाची भूमिका केली होती आर्.एन्. चितळकर यांनी. चितळकर पुढे सी. रामचंद्र म्हणून विख्यात झाले व त्यांनी आपल्या सुमधूर संगीताने सार्‍या भारतावर राज्य केले. या बोलपटांतील ‘‘सुखद सूर सभा’’ हे गीत सी. रामचंद्र यांनीच गायलं होतं. नागानंद मराठी आणि हिन्दी भाषेतून निघाला होता.

सामायिक करा :

नागानंद - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती