मोरूची मावशी
१९४८

विनोदी
३५ मिमी/कृष्णधवल/प्रमाणपत्र क्र. बी ४०५५८/८-१२-१९४८

निर्मिती संस्था :अत्रे पिक्चर्स
निर्माता :चुनीभाई बी. देसाई
दिग्दर्शक :आचार्य प्र. के. अत्रे
कथा :आचार्य प्र.के.अत्रे
पटकथा :आचार्य प्र.के.अत्रे
संवाद :आचार्य प्र.के.अत्रे
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :दिलीप गुप्ता
गीतलेखन :आचार्य प्र.के.अत्रे
ध्वनिमुद्रक :रमेश देसाई
ध्वनिमुद्रिका :एच्. एम्. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :दुर्गा खोटे, वनमाला, दामुआण्णा मालवणकर, राजन, बापूराव माने, पुष्पमाला, बळवंत परचुरे, नागेश जोशी, सुलोचना, शशिकला, आचार्य अत्रे
गीते :१) गाऊ प्रीतीचे गाणे, २) भरा प्याला जीवनाचा भरा प्याला, ३) तू थंडगार पहाटेची आले हं थांब मी राया, ४) नका सासूबाई तुम्ही अडवू नका, ५) मुंबईच्या पोरी काय तुझी चाल, ६) मी बघ हरणुली होईन, ७) घ्या हो राया पानाचा तुम्ही विडा.

कथासूत्र :मोरू पर्वते आणि भय्या डोंगरे दोघे होस्टेलवर राहणारे तरुण.त्यांच्या आश्रयदात्यांकडून त्यांना नियमित पैसे येत असतात.ते दोघे शोभा आणि प्रेमा यांच्या प्रेमात पडतात.त्यांच्या कॉलेजमधील त्या वर्गमैत्रिणीच असतात;पण आपले प्रेम व्यक्त करायचा मोरू आणि भय्याला धीर होत नाही.एके दिवशी मोरूची मावशी आणि भय्याचे काका अचानक येऊन टपकतात.धमाल उडते,पण शेवटी सर्व ठाकठीक होते.
विशेष :कथानक ‘चार्लीज आँट’ या इंग्रजी नाटकावर आधारित.

सामायिक करा :

मोरूची मावशी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती