मायामच्छिंद्र
१९३२

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१५४०५ फूट/१५४ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११८२७/२०-१२-३२

निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
संवाद :गोविंदराव टेंबे, ना.वि.कुलकर
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
कला :साहेबमामा फत्तेलाल
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
कलाकार :दुर्गा खोटे, गोविंदराव टेंबे, मा. विनायक, लीला चंद्रगिरी, राजाराम पुरोहित, बजरबट्टू, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, तानीबाई, हिराबाई
गीते :१) महामंत्र सेवा, २) चंडिका भुवनेश्वरी, ३) जगती पुरुषसमान जाति, ४) चंद्रमा विहार करी, ५) वाटला संसार सोपा, ६) झाली दशा अशी ही, ७) वाकडी जराशी इकडे नजर, ८) टिपरी खेळू या, ९) गुंफू या गोफ रंगी, १०) वाट पाहते, मंदिरी मी, ११) दुंदभी झडे मच्छेंद्रनाथ नामाची, १२) योग साधना समाधि, १३) विकल हृदया विरह शंका, १४) तारका मंडला अवचित, १५) आकले न अघटित घटना, १६) मम जीवन सफल जहाले, १७) शून्य दिसती दशदिशा, १८) सफल जन्म आजी जाहला, १९) अंत कसा पाहस
कथासूत्र :राणी किलोतला ही कामरूप देशाची राणी.इथं सारा कारभार स्त्रियांचा.पुरुषजातीचं नावनिशाण नाही. इथं प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला देहान्तशासन करावं अशी राणीची आज्ञा.राणीच्या या उन्मत्त आणि असुरी वृत्तीनं विश्वातील स्त्रीच्या कोमलतेला काळिमा फासला जात आहे,हे पाहून सद्गुरू मच्छिन्द्रनाथ तिच्या उद्धारासाठी कामरूप देशात येतात.अचेतन वस्तुवरही प्रभुत्व गाजविणारं मच्छीन्द्रनाथांचं अद्भुत सामर्थ्य पाहून राणी किलोतला मच्छीन्द्रनाथांना अनन्यभावे शरण जाते.इतकेच नव्हे तर आपलं राज्य,जीवितही त्यांच्या चरणी अर्पण करते.शेवटी मच्छीन्द्रनाथांचा पट्टशिष्य गोरखनाथ येऊन त्यांना घेऊन जातो.पण नंतर त्याला कळतं की,मच्छीन्द्रनाथ कुठे गेले नाहीत आणि कुठून आलेही नाहीत.तो केवळ मायेचा प्रभाव होता.
विशेष :गोविंदराव टेंबे यांची शिवराज नाटक कंपनी ‘‘सिद्ध संसार” हे नाटक करीत असे. ते ‘मणीशंकर पागल’ ह्यांच्या मूळ गुजराती नाटकाचे मराठी रूपांतर होते. ‘‘सिद्ध संसार” नाटकाचे पुस्तक छापलेले नव्हते. ‘‘सिद्ध संसार” वर चांगला बोलपट निघू शकेल अशी माहिती टेंबे यांनी शांतारामबापूंना दिली. प्रभातच्या संगीत विभागात राजारामबापू नावाचे ऑर्गनवादक होते व ते पूर्वी शिवराज नाटक कंपनीत काम करीत असत. त्यांना हे नाटक संपूर्ण पाठ होते. शांतारामबापूंचा होकार मिळताच हे नाटक त्यांच्याकडून व्यवस्थित लिहून घेऊन पसंतीसाठी शांतारामबापूंना दाखविण्यांत आले. नाटक पसंत पडल्यामुळे शांतारामबापूंनी त्याची पटकथा लिहून मूळ नाटककार मणीशंकर पागल यांच्याकडून बोलपटाचे हक्क विकत घेतले. प्रभातचा हा बोलपट मराठीबरोबर हिन्दीतून दाखविला जात असे.

सामायिक करा :

मायामच्छिंद्र - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती