मराठ्यांतील दुही
१९३२

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/११४७३ फूट/१०८ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१६५२९/२४-७-३७(आर)

निर्मिती संस्था :छत्रपति सिनेटोन
दिग्दर्शक :बाळासाहेब यादव
संवाद :र.कृ.चिंचलीकर
संगीत :अण्णासाहेब माईणकर
छायालेखन :जी.ए.कांबळे, बाबा साखरीकर
कला :एस्.एन्.कुलकर्णी, शंकरराव गायकवाड
ध्वनिमुद्रक :दादासाहेब तोरणे
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :शंकरराव मिसाळ, बाळासाहेब यादव, रामचंद्रराव पोवार, के. नारायण, श्रीपाद नारायण, झुजांरराव पवार, बी.नांद्रेकर, पद्माबाई, हंसाबाई
गीते :१) करविली तैंसी केली कटकट, २) होशियार याश आमदे शाहे, ३) धीर शूर तव मूर्ति, ४) शोभली का वीर जाया, ५) पावो जय सतत, ६) मर्द बहादुर मराठा शूर, ७) महाराज पडले चिंतेत.
कथासूत्र :संभाजीच्या मृत्यूनंतर म्हणजे साधारण १८६९ सालात घडलेली गोष्ट.राज्याची जबाबदारी छोट्या राजाराम महाराजांवर पडली होती.यवनांनी रायगडाला वेढा घातला होता.मराठ्यांजवळ मनुष्यबळाची कमतरता होती.तरीही संताजी घोरपडे या शूर आणि नेक मराठी सरदाराने राजाराम राजांना रायगडातून बाहेर काढले आणि सुरक्षितपणे जिंजी किल्ल्यावर नेले.पण विद्रोही सूर्याजी पिसाळने संताजींविरुद्ध राजाराम राजांचे कान फुंकले व त्यांच्यामार्फत संताजीला देहांताची शिक्षा फर्मावली.राजाज्ञेची अंमलबजावणी झाली.पण सत्य परिस्थिती कळल्यानंतर मात्र राजाराम राजांना अतिशय दुःख झाले.
विशेष :मराठी चित्रपटातला पहिला पोवाडा ‘‘मर्द बहादूर मराठा शूर” तसेच ‘‘होशियार याश आमदे शाहे” हे हिन्दी गाणे येण्याचा पहिलाच प्रसंग. हिन्दी आवृत्ती ‘अमर शहीद”.

सामायिक करा :

मराठ्यांतील दुही - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती