माणूस
१९३९

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४४२५ फूट/१२८मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २१४३९

निर्मिती संस्था :प्रभात चित
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ए. भास्करराव
संवाद :अनंत काणेकर
संगीत :मास्टर कृष्णराव
छायालेखन :व्ही. अवधूत
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :अनंत काणेकर
कला :साहेबमामा फत्तेलाल
गीत मुद्रण :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
ध्वनिमुद्रक :शंकरराव दामले
ध्वनिमुद्रिका :नॅशनल ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया, मुंबई यांनी यंग इंडिया लेबलवर ध्वनीमुद्रिका काढल्या होत्या
निर्मिती स्थळ :पुणे
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :शाहू मोडक, शांता हुबळीकर, बुवासाहेब गौरी, मा. छोटू, बाई सुंदराबाई, राम मराठे, मंजू, मानाजीराव
गीते :१) ताँव तानार नाँव, कशाला उद्याची बात, २) तोड तोड भोगजाल रे नरा, ३) गुलजार नार न्यारी, ४) प्रेमाची फुटली पेठ लुटूया प्रेमाचा बाजार, ५) जा जा मुशाफिर तू रे, आम्ही वळखलं गं, ६) आम्ही वळीखलं गं, ७) दिवाळी दिवाळी आली, ८) मन पापी भूला, ९) गेली भंगुनी जरी धरणी.
कथासूत्र :गणपत एक सरळमार्गी पोलीस मैना या वेश्येकडे आकर्षित होतो.समाज आपल्याला पती-पत्नी म्हणून मान्य करणार नाही हे मैना त्याला पटवायचा प्रयत्न करते.तरी तो तिला सोडायला तयार नसतो.मामाच्या खुनाच्या आरोपात ती दोषी ठरते.तिला जन्मठेप होते.गणपतीसाठी ती निरोप ठेवते,आयुष्य हे जगण्यासाठी आहे,ते वाया घालवू नकोस.
विशेष :मराठी भाषेखेरीज उर्दू, गुजराथी, पंजाबी, बंगाली व तामीळ या प्रादेशिक भाषांमधे एकेक कडवे असलेले पहिले बहुभाषी गीत. प्रेमी प्रेमनगर को आये...लुटूया प्रेमाचा बाजार, हे देवदास मधील आत्यंतिक प्रेमाचे विडंबनगीत म्हणून घातले गेले. शांतारामबापूंच्या उत्कृष्ट टेकिंगमुळे ‘माणूस’ चार्ली चाप्लीनला आवडला होता. हिंदी आवृत्ती ‘आदमी’.

सामायिक करा :

अधिक माहिती