कृष्णार्जुन युद्ध
१९३४

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/११२१२ फूट/१२५ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३६३७/१३-७-३४

निर्मिती संस्था :बलवंत पिक्चर्स
दिग्दर्शक :चितामणराव कोल्हटकर, वा. ना. भट, विश्राम बेडेकर
कथा :विश्राम बेडेकर
पटकथा :डब्ल्यू.एन्.भट
संगीत :मा. दीनानाथ, मा.गणपतराव मोहिते (अविनाश)
छायालेखन :मा. पोंक्षे
कला :बाळ गजबर
ध्वनिमुद्रक :पिशवीकर
निर्मिती स्थळ :सांगली
कलाकार :मा. दीनानाथ, निर्मलादेवी, सुशिलादेवी, नलिनी नागपूरकर, शंकर मिसाळ, बाळकृष्ण गोखले, मा. मोहिते (अविनाश), पुरुषोत्तम बोरकर, रामचंद्र मराठे, दामुआण्णा मालवणकर
गीते :१) आला दर्शना भुकेला, २) जय जगदिशा दयाघना, ३) सखी मुख का हे, ४) प्रीतीचा फुलोरा, ५) प्रेमसुधा ही भासे, ६) करी गुणगान वंदुनिया, ७) शशी विकासे, ८) सुहास्य तुझे, ९) अभागिनी नलिनी, १०) बॅ. सावरकर (‘‘संन्यस्त खड्ग’’ नाटक) सखा तुझा जातो, ११) करुणाकरी कोदंडधारी, १२) पावा हे माधवा, १३) यदुराया अजी तोषला मनी.
कथासूत्र :कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील एका तणावाच्या प्रसंगावर आधारित.उर्वशीचा पती चित्ररथाला, कृष्ण देहांताची शिक्षा फर्मावतो.पण चित्ररथाच्या जीविताची जबाबदारी अर्जुनाने घेतलेली असते.साहजिकच दोघेही आपापल्या वचनांना जागण्याचा निश्चय करतात आणि दोघांमध्ये इथेच पहिल्यांदा ठिणगी पडते.पण नारद आपल्या मध्यस्तीने दोघातील कलह मिटवतात.
विशेष :सखा तुझा जातो हे बँ. सावरकर यांच्या ‘‘सन्यस्त खड्ग’’ या नाटकातले गीत बॅरिस्टरांच्या परवानगीने घेतले होते. बोलपट मराठी आणि हिन्दी अशा दोन्ही भाषेतून काढण्यांत आला होता.

सामायिक करा :

कृष्णार्जुन युद्ध - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती