कालियामर्दन
१९३५

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२५०२ फूट/११३ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १४२३३/२-२-३५

निर्मिती संस्था :कोल्हापूर सिनेटोन
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर, मेजर दादासाहेब निंबाळकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :गजानन कांबळे
गीतलेखन :भालजी पेंढारकर
कला :शंकरराव शिदे
ध्वनिमुद्रक :चिंतामणराव मोडक
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :मा. मधुकर, लीला चंद्रगिरी, इंदुबाला, राम भद्रे, शंकरराव भोसले, चिटणीस, इब्राहीम
गीते :१) धार दे ग कपीला माई, २) अरं आता गाई घेऊन, ३) श्याम हृदय संगे, ४) शाम इथे हा, ५) गंमत जणू नांदे, ६) हे श्यामसुंदर मोहना, ७) बाळ माझा कन्हैया, ८) कृष्णप्रेमी रंगले आता, ९) ना हो राजा आभूषण भरे, १०) शेती गोपाळांची माय, ११) हांसवी चराचरा घनःश्याम, १२) यमुना तू माई दावी, १३) देवाधी देवराया, १४) हे श्याम धीरा दयासागरा.
कथासूत्र :कालासुर कालियाच्या रूपात यमुना नदीत वास्तव्य करून होता.आपल्या शरीरातील विषाचा कृष्णावर प्रयोग करून त्याला ठार मारण्याचा त्याचा बेत होता.कालियाच्या विषाची तीव्रता इतकी होती की,यमुनेचं पाणीच नाही तर आजूबाजूच्या झाडांवरही या विषाचा परिणाम झाला होता.पण कृष्ण-कालिया युद्धात कृष्णाच्या प्रभावापुढे कालिया हतबल ठरला आणि कालियाचा मृत्यू झाला.
विशेष :मराठी बरोबरच ‘‘मुरलीवाला” या नावाने हिंदीतही प्रकाशित झाला होता.

सामायिक करा :

कालियामर्दन - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती