जिवाचा सखा
१९४८

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/प्रमाणपत्र क्र. बी ४०५५४/ ७-१२-१९४८

निर्मिती संस्था :मंगल पिक्चर्स
निर्माता :वामनराव कुलकर्णी, विष्णूपंत चव्हाण
दिग्दर्शक :राजा परांजपे
कथा :(उघड्या जगात कादंबरी), म. मा. भोसले
पटकथा :ग. दि. माडगूळकर
संवाद :ग. दि. माडगूळकर
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :वसंत बेलतंगडी
संकलक :राजा ठाकूर
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर
कला :वासुदेव सडोलीकर
रंगभूषा :निवृत्ती दळवी, स्वामी
नृत्य दिगदर्शक :बद्रीप्रसाद
स्थिरचित्रण :पंत धर्माधिकारी
ध्वनिमुद्रक :गोविंदराज दामले
निर्मिती स्थळ :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :जयराम शिलेदार, सुलोचना, दादा साळवी, सरोज बोरकर, विष्णूपंत जोग, राजा परांजपे, शकुंतला जाधव, चंद्रकांत गोखले, पुष्पा आंबेडकर, रविंद्र, सुबोधिनी, धुमाळ, वसंत शिंदे
गीते :१) चल ग सखे वारूळाला, २) रूणझुणत्या पाखरा तू जा माहेरा, ३) एक सुरात घुंगरू बोले, ४) वृंदावनी बाई कुणी तुळस लाविली, ५) वारीयाने कुंडले हाले, ६) तुझ्या डोळ्यांच पाडलं चांदणं, ७) एक डाव तुला मी पाहिली उभी गं माडीत, ८) औंदाबाई आले मी लग्नाला.

कथासूत्र :जिवा गरीब बिचारा शेतकरी.त्याची मुलगी जमीनदार फूस लावून पळवून नेतो.मुलीचं काय झालं हे कळण्यापूर्वीच जीवाला मृत्यू येतो.त्याला सत्यघटना समजत नाही.त्याच्या मुलाला - सखारामला - जमीनदाराच्या मुलीकडून कळतं की,तिच्या बापानं सखारामच्या बहिणीवर कशा तऱ्हेनं जुलुमजबरदस्ती केली आहे.सखाराम जमीनदारांचा सूड घ्यायला जातो.पण त्याच्या मुलीवरचं प्रेम त्याला त्यापासून परावृत्त करतं.शेवटी काळच सर्व यथासांग आणि योग्य ते घडवून आणत असतो.
विशेष :राजा परांजपे, सुधीर फडके व ग.दि.माडगूळकर या मराठी चित्रसृष्टीत अत्यंत गाजलेल्या त्रयीचा पहिला रौप्यमहोत्सवी चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती