निर्मिती संस्था :कोल्हापूर सिनेटोन
दिग्दर्शक :दादासाहेब फाळके
कथा :दादासाहेब फाळके
पटकथा :दादासाहेब फाळके
संवाद :दादासाहेब फाळके
संगीत :विश्वनाथबुवा जाधव
छायालेखन :वासुदेव कर्नाटकी, राजाराम घोडके
संकलक :बाबाराय फाळके, बी.बी.गायकवाड
गीतलेखन :दादासाहेब फाळके
कला :शंकरराव शिंदे
अभिनव दृश्य व चमत्कार :बाबाराया फाळके
ध्वनिमुद्रक :बाळ चव्हाण
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :चिटणीस, सुरेश परदेशी, देशपांडे, भागवत, शंकरराव भोसले, पठाण, इब्राहीम, गवळ, डोंगरे, बर्ची बहाद्दर, महानंदा, लीला मिश्रा, अनूसयाबाई
गीते :१) पर्जन्याचा थेंब नसे प्रभु, २) सुंदरा श्रीधरा सुखकरा, ३) प्रभुराया देई विजय बाळा, ४) अश्व सोडिला राजा, ५) सारा वृथा पसारा, ६) जगती सुख नच, ७) ने मज आता दयावंता, ८) ही नवि बाला, ९) दाऊ चला शौर्यासी, १०) प्रेमे या दासी, ११) जगन्नाथ मन्नाथ गौरी, १२) बंबं महेश बम बोला, १३) परनारी परविनी, १४) शरण मी तुझ्या, १५) शांत होई कांत वच मम, १६) जटा कटोह संभ्रम, १७) जगाच्या कल्याणा जावे मी भूवरी.
कथासूत्र :हिमालयाची कन्या गंगा सगर राजाच्या पुत्रांच्या उद्धारासाठी शिवाच्या जटांतून जलस्वरूपात वाहू लागते.शिवाशी विवाह करायला नकार दिलेली गंगा मानवजातीच्या कल्याणासाठी अभोगीचं जीवन जगते.कपिल मुनींचा समाधीभंग केल्याबद्दल ते सगराच्या सहस्त्र पुत्रांना भस्मसात करतात.सगरचा नातू भगीरथ घोर तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीतलावर आणण्यात यशस्वी होतो.
विशेष : भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ‘पहिला’ बोलपट व शेवटची कलाकृती मराठी व हिन्दीत.