चंद्रसेना
१९३५

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२२०७ फूट/११२ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१४७३३/१५-६-३५

निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :शिवराम वाशीकर
पटकथा :शिवराम वाशीकर
संवाद :शिवराम वाशीकर
संगीत :केशवराव भोळे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :के. नारायण काळे
कला :साहेबमामा फत्तेलाल
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :व्ही. दामले
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :नलिनी तर्खड, रजनी, सुरेशबाबू माने, कुलकर्णी, माने पहेलवान, केळकर, मानाजीराव, बुवासाहेब, शांताबाई, अझूरी
गीते :१) मंगलमया मदिरा, २) मदिरा मदिराक्षी सुलक्षणा, ३) जगती न मजा मदिरेवीणा, ४) नयानास आस पाहवी तव मूर्ति शामला, ५) पोरी चोरी नव्हे, ६) मज तूच होसी माता, ७) होत मुदित मन अजी सुदिन हा उदेला, ८) सुरा ही सुखखाणी, ९) भर सखे सुरस रस प्याला, १०) काय असे जाहले कळेना, ११) त्वरित प्रभु सदया, १२) धरी ना हृदयी मोहा.
कथासूत्र :पाताळ लोकच्या नागराजाची कन्या चंद्रसेना हिचा विवाह महिकावतीचा राजा अही याच्या भावाशी - महीशी - झालेला असतो.चंद्रसेना मद्य पीत नाही,यामुळे सगळे तिच्यावर रुष्ट असतात.त्यातच चंद्रसेना परम रामभक्त असते.यावेळी राम-रावण युद्ध सुरु असतं.रावण अही-महीकडं मदतीसाठी निरोप पाठवतो व राम-लक्ष्मणाचा वध करण्याचे सुचवतो.अही-मही कपटानं राम-लक्ष्मणाला पळवून पाताळ लोकात आणतात आणि देवीसमोर त्यांचा बळी देण्याचे ठरवतात.मारुती आपल्या बुद्धिचातुर्याने आणि असीम सामर्थ्याने राम- लक्ष्मणाची सुटका करतो.राम-लक्ष्मण व महीचं घनघोर युद्ध होतं.महीच्या रक्तबिंदूतून अनेक अही-मही निर्माण होऊन त्यांच्यावर विजय मिळवणं कठीण होतं.मारुती चंद्रसेनेकडे जाऊन महीच्या मरणाचं रहस्य जाणून घेतो व त्यामुळे अही-महीचा मृत्यू होतो.
विशेष :प्रभातने मराठीबरोबरच हिन्दी आणि तामिळ भाषेतही ह्या बोलपटाच्या आवृत्त्या काढल्या होत्या. चंद्रसेनामधील अझूरीचा नाच शांतारामबापूंनी
मोठ्या कलात्मक पद्धतीने चित्रित केला होता. हा नाच तबला डग्ग्यातील डग्याच्या आकृती प्रमाणे तीन मोठ्या ड्रम्सवर घेतला.
स्वदेश हितचिंतक मंडळी ‘चंद्रसेना’ हे श्री .पु. भा. डोंगरे यांच्या नाटकाचे हातखंडा प्रयोग करत असे. त्याच नाटकावरून हा चित्रपट घेण्यांत आला होता.

सामायिक करा :

चंद्रसेना - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती