भाग्यरेखा
१९४८

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/प्रमाणपत्र क्र. बी ३८१०४/३०-३-१९४८

निर्मिती संस्था :भारत चित्रदर्शन
निर्माता :टापरे बंधू
दिग्दर्शक :शांताराम आठवले
कथा :नारायण हरी आपटे
पटकथा :ना. ह. आपटे
संवाद :ना. ह. आपटे
संगीत :केशवराव भोळे, श्रीधर पार्सेकर
छायालेखन :मनोहर कुलकर्णी
संकलक :जे. एफ्. चाऊस
गीतलेखन :ना. ह. आपटे
कला :बी. डी. थत्ते, व्ही. सडोलीकर
रंगभूषा :गुप्ते, दौलतराव
वेषभूषा :गुप्ते, दौलतराव
स्थिरचित्रण :चिमा घोरपडे
ध्वनिमुद्रक :गोविंदराव दामले
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :शांता आपटे, बाबूराव पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सुधा आपटे, गौरी, गणपतराव तांबट, करमरकर, सरोज बोरकर, मधू आपटे, मांजरेकर, सुबोधिनी
गीते :१) देवा खरा आधार, २) अरे पाटलाच्या पोरा, ३) पाहिजे पोटाला भाकरी, ४) माझ्या माहेरी सुखाची सावली, ५) वीरा झोप सुखे तू घेई, ६) काल ही गोपी यमुना जळीं
कथासूत्र :बाबाराव देशमुखांचं कुटुंब विलक्षण.ते स्वतः कडवे देशभक्त असतात.मुलगा मधुकर आणि कन्या माणिक यांचीही देश ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र व्हावा म्हणून तळमळ.मधुकर देशकार्यासाठी भूमिगत होतो.त्याची वाग्दत्त वाढू विवाहापूर्वीच गरोदर राहते.त्यामुळं तिच्यावर जहरी टीका होऊ लागते.परंतु दुःखद प्रसंगांना तोंड देत या प्रकरणाचा शेवट गोड होतो.

सामायिक करा :

भाग्यरेखा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती