निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ना. वि. कुलकर्णी
संवाद :ना. वि. कुलकर्णी
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :गोविंदराव टेंबे
कला :साहेबमामा फत्तेलाल
वेषभूषा :एच्.एस्.काकडे
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
कलाकार :गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, मा. विनायक, शंकरराव भोसले, मानाजीराव माने, बुवासाहेब, कुमार दिगंबर
गीते :१) जय जय राजाधिराज, २) दिव्य महेंद्र पदांना, ३)आदि पुरूष नारायण, ४) आनंद देई आली सुमन लीला, ५) सत्व पालना विना नाहि मानवा, ६) बाळा का झोप येईना, ७) वंदना महादेवा, ८) परम धर्म सत्यापरता, ९) इंदिरावरा मिळेना, १०) धन्य धरणी विचरें, ११) हे चंद्रमौली, १२) सार्थ झाले जीवन हे, १३) बालरवी गेला विलया, १४) दैव संकेत सीमा, १५) शिवशंकरा गिरिजावरा
कथासूत्र :सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या आयुष्यावर आधारित चित्रपट.राजाची परीक्षा पाहण्यासाठी विश्वामित्र ऋषी दक्षिणा म्हणून सिंहासनाची मागणी करतात.त्यासाठी राजाला काशीला जाऊन हलकीसलकी कष्टाची कामे करावी लागतात.तर राणी तारामती मोलकरणीसारखी घरकाम करते.गंगानाथ तिला लिलावात विकत घेतो.त्याची राणीवर पापी नजर असते.एका अवघड प्रसंगी रोहिदास आईच्या सुटकेला धावतो.पण तो गंगानाथकडून मारला जातो.ते बालंट तारामतीवर येते.तिला शिरच्छेदाची शिक्षा होते.ती कामगिरी डोंबाघरी राबणाऱ्या हरिश्चन्द्रावर येते.पण ऐनवेळी शंकर प्रगट होतात आणि तारामतीला वाचवतात.अशा रीतीने राजा हरिश्चंद्र विश्वामित्र ऋषींच्या परीक्षेला पुरेपूर उतरतो. प्रसन्न झालेले ऋषी राजाला त्याचं राज्य परत करतात.
विशेष :अयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.