अग्निकंकण
१९३२

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/११६५१ फूट/१०८ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११४६३/८-७-३२

निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :नर्मदाप्रसाद आसी
संवाद :गोविंदराव टेंबे
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :गोविंदराव टेंबे
कला :साहेबमामा फत्तेलाल
वेषभूषा :एच्.एच्.काकडे
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
कलाकार :लीला चंद्रगिरी, कमला, मा. विनायक, बाबूराव पेंढारकर, निंबाळकर, माने, बुवासाहेब, शंकरराव भोसले, गजानन जागीरदार
गीते :१) कोण कुठोनी आलासी, २) देई मना शांती, ३) वेल सुकुमार, ४) राधे ! इतुका अबोला, ५) पिऊनी विपुल कुसुमरसा, ६) कन्या ही रास संकटाची, ७) फुलति कलिका उपवनी, ८) झुंजारवीर सरदार, ९) प्रभुवरा करुणा करा, १०) मानस मंदिर भंग पावता, ११) कालचक्र ना कोणा थांबावे, १२) योजितो नर एक काही, १३) दैव कोपले, १४) लगबगीने ऐन दुपारी, १५) तूचि आम्हां तात माता.
कथासूत्र :वैजयंती राज्याचा दुष्ट सेनापती राज्यात क्रांती घडवून आणतो व राजाचा खून करतो.राणी वीरमती हिकमतीनं राजपुत्रासह निसटते आणि जंगलात आसरा घेते.राजपुत्र २१वर्षांचा होतो आणि राज्य परत मिळवण्याच्या निश्चयाने राज्यात येतो.त्याची आणि अमात्यकन्येची गाठ पडते.पण अमात्यकन्येनं आपल्याशी लग्न करावं यासाठी सेनापती प्रयत्न करत असतो.शेवटी राजपुत्र सेनापतीचा लढाईत पराभव करतो.त्याचं राज्य त्याला परत मिळतं आणि अमात्यकन्येशी त्याचा विवाह होतो.
विशेष :हिन्दी आवृत्ती ‘‘जलती निशानी” (Branded Oath) म्हणून प्रदर्शित.

सामायिक करा :

अग्निकंकण - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती