आकाशवाणी
१९३४

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३६१६ फूट/१२६मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी३३४९१/२५-५-३४

निर्मिती संस्था :कोल्हापूर सिनेटोन
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :गुंडोपंत वालावलकर
छायालेखन :व्ही.बी.जोशी
गीतलेखन :भालजी पेंढारकर
कला :शंकरराव शिंदे
गीत मुद्रण :वालावलकर, चितामण मोडक
ध्वनिमुद्रक :वालावलकर, चितामण मोडक
निर्मिती स्थळ :पुणे
रसायन शाळा :कोल्हापूर सिनेटोन
कलाकार :लीला चंद्रगिरी, नानासाहेब फाटक, मा. विनायक, डॉ. साठे, बाबूराव पेंढारकर, मा. वसंत, शिरोडकर, भद्रे, भालजी पेंढारकर
गीते :१) जय जय जगत्जननी, २) न्याय करील देवराय, ३) आली उषा ही हसरी, ४) आलो शरण चरणी माते, ५) रुसलीस काय सखये, ६) बाला दावीती दया, ७) धरी धीर वीर प्रभू, ८) सखीवीणा जगी या, ९) आली तशी नेली, १०) बिगी बिगी या गवळणी , ११) ये बाळा रे तहानेले डोळे, १२) पसरली दिव्य प्रभा, १३) हे श्याम धीरा प्रभो.
कथासूत्र :उग्रसेनाचा वध करून कंसाने त्याचे राज्य बळकावले व तो उद्दामपणे राज्य करू लागला.सगळी प्रजा त्याच्या जुलुमाला कंटाळून गेली होती.त्याच्या बहिणीचा विवाह वसुदेवाशी झाला होता.या दोघांना होणाऱ्या आठव्या पुत्राच्या हातून कंसाचा वध होणार आहे,ही 'आकाशवाणी'ऐकून कंस घाबरला.त्याने वसुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले.पण देवकी-वसुदेवाचा आठवा पुत्र म्हणजेच कृष्ण.याला जन्मतःच नंद आणि यशोदेकडे आणून सोडले.त्यामुळे कृष्णाचे प्राण वाचले.पुढे कृष्णाने कंसाचा वध केला.अशा रीतीने आकाशवाणी खरी ठरली.
विशेष :या चित्रपटासमावेत ‘‘बंकभट’’ नावाचा व्यंगपट दाखवला जात असे. मराठी भाषेत तयार झालेला हा पहिला व्यंगपट. या व्यंगपटाची निर्मिती गणपतराव भोसले यांनी केली होती. आकाशवाणी हा मराठी आणि हिन्दी दोन्ही भाषेतून निर्माण केला होता.

सामायिक करा :

आकाशवाणी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती