२२ जून १८९७
१९७९

देशभक्तीपर
३५ मिमी/रंगीत/११५मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८९४३७/९-२-१९७९./यू

निर्मिती संस्था :संकेत
दिग्दर्शक :जयू पटवर्धन, नचिकेत
कथा :नचिकेत पटवर्धन
पटकथा :शंकर नाग, नचिकेत पटवर्धन
संवाद :विजय तेंडूलकर
संगीत :आनंद मोडक
छायालेखन :नवरोज काँट्रॉक्टर
संकलक :मधु सिन्हा
कला :जयू पटवर्धन
वेषभूषा :जयू पटवर्धन
ध्वनिमुद्रक :विनय श्रीवास्तव
रसायन शाळा :राजकमल कला मंदिर
कलाकार :प्रभाकर पाटकर, रविंद्र मंकणी, उदयन दिक्षित, वासूदेव पाळंदे, शांता जोग, अरूंधतीराव, सुजल वाटवे, दिपाली कुलकर्णी, सतिश खरे, सदानंद बोरसे, सुरेश भसाळे, जयराम हार्डीकर, जॉन आयर्विग, सदाशिव अमरापूरकर, रॉड गिल्बर्ट, अमोल पालेकर
कथासूत्र :वॉल्टर रँड,प्लेग ऍडमिनिस्ट्रेटर हा प्लेगच्या निमित्ताने त्याने केलेल्या अत्याचाराने अत्यंत अप्रिय झाला होता. ब्रिटीशांवर राग असलेल्या तरुण ब्राम्हण तरुणांचा नेता होता दामोदर चाफेकर. रँडचा सूड उगवायचा असे हे तरुण ठरवतात. २२ जून १८९७ला राणी विक्टोरियाच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या पार्टीला रँड गव्हर्नमेंट हाऊसवर गेलेला असतो.परत येताना गणेशखिंडीत त्याचा वध केला जातो.इन्स्पेक्टर गुईन गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी २०,०००रु.बक्षीस जाहीर करतो.निळू द्रविड,एकेकाळचा या साऱ्यांचा सहकारी बक्षिसाच्या लालसेने माहिती पुरवतो.चाफेकर बंधूंना अटक होऊन त्यांना फाशी होते. दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव चाफेकर अमर होतात.
विशेष :मराठी भाषेतील समांतर सिनेमा पैकी एक महत्वाचा चित्रपट, संगीतकार आनंद मोडक, दिग्दर्शक नचिकेत व जयू पटवर्धन, रविंद्र मंकणी वगैरे कलाकार/तंत्रज्ञ या चित्रपटामधे प्रथमच आले, याचा पहिला खेळ जानेवारी १९८० मधे बंगलोर येथील फिल्मोत्सव मधे झाला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

सामायिक करा :

२२ जून १८९७ - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती