चित्र-चरित्र

पूजा सावंत
पूजा सावंत
अभिनेत्री
२५ जानेवारी १९९०

पूजाचा जन्म मुंबईचा. दादरच्या बालमोहन शाळेत तिचं शिक्षण झालं. शालेय पातळीवरील नाटकं, एकांकिका स्पर्धांमध्ये तिनं भाग घेतला होता. त्यानंतर ‘बुगी वुगी’, ‘एकापेक्षा एक’ या रिअॅलिटी शोमधून ती झळकली. ‘क्षणभर विश्रांती’ हा तिचा पहिला चित्रपट. ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘पोस्टर बॉईज’, ‘गोंदण’, ‘सांगतो ऐका’, ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’ हे तिचे महत्त्वपूर्ण चित्रपट.

'विजेता', 'बोनस', 'जंगली', 'भाई व्यक्ती की वल्ली २', 'भेटली तू पुन्हा', 'बस स्टॉप' हे तिचे अलीकडचे काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट.

-मंदार जोशीचित्र-चरित्र