चित्र-चरित्र

अमृता खानविलकर
अमृता खानविलकर
अभिनेत्री
२३ नोव्हेंबर

अमृता मूळची मुंबईची. पण तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले. अमृताची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या २००४ मधील "झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज" या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर ‘सहारा वन’ दूरचित्रवाहिनीवरील "अदा" या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने ‘झी म्युझिक’ वाहिनीवरील "बॉलिवुड टु नाइट" या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील "कॉमेडी एक्सप्रेस" (२०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै २०१२ मध्ये तिने "कॉमेडी एक्सप्रेस" कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले. २००६ मधील ‘गोलमाल’ चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘साडे माडे तीन’, ‘दोघात तिसरा आता सगळे विसरा’, ‘गैर’, ‘नटरंग’, ‘अर्जुन’, ‘झकास’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी रे’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वन वे तिकीट’ हे तिचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘हॅटट्रीक’, ‘कॉन्ट्रॅक्ट’, ‘फूंक’ या हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
-मंदार जोशीचित्र-चरित्र