चित्र-चरित्र

सिद्धार्थ चांदेकर
सिद्धार्थ चांदेकर
अभिनेता
१४ जून

रंगभूमी, चित्रपट आणि टीव्हीवर लीलया वावरणारा आजच्या घडीचा हरहुन्नरी अभिनेता म्हणून सिद्धआर्थ चांदेकरकडे पाहिले जाते. सिद्धार्थ मूळचा पुण्याचा. पुण्यातील एस. डी. कटारिया शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर तो कलाक्षेत्राकडे वळला. ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र त्यानंतर तो मराठी मालिका तसेच चित्रपट क्षेत्रामध्ये रमला. ‘अग्निहोत्र’ ही त्याची पहिली मालिका. ‌त्यानंतरच्या दशकभरात त्याने वीसहून अधिक मराठी चित्रपच केले. त्यापैकी उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ‘झेंडा’, ‘बालगंधर्व’, ‘सतरंगी रे’, ‘बसस्टॉप’, ‘संशयकल्लोळ’, ‌‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘वजनदार’, ‘ऑनलाइन बिनलाइन’. ‘गुलाबजाम’ चित्रपटामधील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.
मंदार जोशीचित्र-चरित्र