चित्र-चरित्र

अनिकेत विश्वासराव
अनिकेत विश्वासराव
अभिनेता
७ मे १९८१

मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका या तीनही माध्यमांमध्ये सध्या लीलया वावरणारा कलावंत म्हणजे अनिकेत विश्वासराव. मुंबईतील एम. एल. डहाणूकर महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर अनिकेत कलाक्षेत्राकडे वळला. सर्वसाधारणपणे मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केल्यानंतर मराठी कलावंतांचं हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण घडतं. मात्र अनिकेतनं उलटा प्रवास केला. सुधीर मिश्रांच्या २००३ मधील ‘चमेली’ चित्रपटामधून त्यानं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तो ‘हवा आने दो’ या चित्रपटातही झळकला. हिंदी चित्रपटामधून पदार्पण करूनही नंतर त्यानं मराठी चित्रपटांना प्राधान्य दिलं. ‘लपून छपून’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘गिल्टी’, ‘सावरिया डॉट कॉम’, ‘रंगीबेरंगी’, ‘आघात’, ‘लाडीगोडी’, ‘स्पंदन’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘अघोर’, ‘येडा’, ‘धमक’, ‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’ हे त्याचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. ‘कळत नकळत’, ‘ऊन पाऊस’, ‘एकापेक्षा एक’ या कलाकृतींद्वारे तो छोट्या पडद्यावरही पाहायला मिळाला. ‘लव्ह बर्डस्’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘नकळत सारे घडले’ या रंगभूमीवरील कामाद्वारेही तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. -मंदार जोशीचित्र-चरित्र