चित्र-चरित्र

रीमा लागू
रीमा लागू
अभिनेत्री
२१ जून १९५८ --- १८ मे २०१७

रीमा लागू या आधीच्या नयन भडभडे. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून रीमा यांच्या चित्रपट सृष्टीत सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमी तसेच मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘आक्रोश’, 'कलयुग' हे त्यांचे सुरुवातीचे दर्जेदार चित्रपट. 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' आदी चित्रपटांमुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘पुरूष’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘छापाकाटा’ ही त्यांची गाजलेली नाटके. ‘तू तू मैं मैं’ ही त्यांची अत्यंत गाजलेली मालिका. ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’, ‘सावली’, ‘शुभमंगल सावधान’, ‘घराबाहेर’, ‘रेशीमगाठ’, ‘नवरा माझा नवसाचा’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट.



चित्र-चरित्र