चित्र-चरित्र

जितेंद्र जोशी
जितेंद्र जोशी
अभिनेता
२७ जानेवारी

नाटकं, मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये जितेंद्र जोशी हे नाव आग्रहानं घेतलं जातं. अभिनेता, कवी आणि सूत्रसंचालक अशा विविध स्वरूपात तो प्रेक्षकांसमोर आला आणि प्रत्येक भूमिकेत तेवढाच लोकप्रिय झाला. जितेंद्रने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सतीश राजवाडे यांच्यासोबत त्यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘नकळत सारे घडले’, ‘हम तो तेरे आशिक है’मधल्या त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. त्याने मराठीवरच्या ‘हास्यसम्राट’ या मालिकेचं सूत्रसंचालन केलं. त्याच्या विनोदी स्वभावाचं दर्शन या कार्यक्रमातूनही घडलं. अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं "कोंबडी पळाली" हे गाणं लिहीणारे गीतकार जितेंद्र जोशीच आहेत. ‘पक पक पकाक’, ‘गोलमाल’, ‘सुंबरान’, ‘गुलमोहर’, ‘झकास’, ‘मॅटर’, ‘कुटुंब’, ‘तुकाराम’, ‘दुनियादारी’, ‘बाजी’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’ हे त्याचे काही उल्लेखनीय चित्रपट.चित्र-चरित्र