चित्र-चरित्र

अमेय वाघ
अमेय वाघ
अभिनेता
१३ नोव्हेंबर १९८७

अमेयचा जन्म पुण्याचा. तिथेच त्याचं बालपण गेलं. शालेय स्तरावरील अनेक बालनाट्य स्पर्धांमध्ये अमेयनं भाग घेतला. त्यानंतर महाविद्यालयीन स्तरावरील पुरुषोत्तम करंडक तसेच इतर स्पर्धांमध्येही अमेयनं आपला ठसा उमटवला. ‘पोपट’, ‘घंटा’, ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘अय्या’, ‘शटर’, ‘जोशी की कांबळे’ हे त्याचे काही महत्त्वाचे चित्रपट. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘कट्यार काळजात घुसली’ यासारख्या यशस्वी नाटकांचाही तो एक भाग बनला. ‘बॉम्ब्ड’, ‘द गव्हर्मेंट इन्स्पेक्टर’ या इंग्रजी नाटकांमधूनही त्यानं अभिनय केला आहे.
-मंदार जोशीचित्र-चरित्र