चित्र-चरित्र

अदिती देशपांडे
अदिती देशपांडे
अभिनेत्री
१४ जानेवारी

मराठी चित्रपटांमध्ये वेगळ्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अदिती देशपांडे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या पहिल्याच चित्रपटाद्वारे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केले. विशेष म्हणजे या चित्रपटाची त्यांनी निर्मितीही केली होती. मोजक्याच परंतु लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारण्याकडे त्यांचा अधिक भर आहे. त्यानंतर त्यांनी ‘होतं असं कधी कधी’, ‘दशक्रिया’, ‘वजनदार’, ‘जोगवा’, ‘पक पक पकाक’ आदी उल्लेखनीय चित्रपटांमध्ये अभिनय केला. अलीकडच्या काळात ‘ मैं मायके चली जाऊंगी’ या मालिकेतही त्यांनी काम केलं होतं. प्रायोगिक रंगभूमीसाठीही त्यांनी बरेच काम केले आहे.

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमध्ये अदिती यांनी साकारलेली 'जीजी अक्का'ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

-मंदार जोशीचित्र-चरित्र