चित्र-चरित्र

अश्विनी एकबोटे
अश्विनी एकबोटे
अभिनेत्री
५ जानेवारी १९७२ --- २२ ऑक्टोबर २०१६

मराठी चित्रपट, मालिका आणि नाटके या तीनही माध्यमांमध्ये अश्विनी एकबोटे यांनी भरपूर काम केलं. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘महासत्ता’, ‘व्हेकेशन’, ‘तप्तपदी’, ‘एफयू’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘बावरे प्रेम हे’ हे त्यांचे काही महत्त्वाचे चित्रपट. ‘दुहेरी’, ‘दुर्वा’, ‘राधा ही बावरी’, ‘उंच माझा झोका’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकांमुळे त्या घरोघरी पोचल्या. ‘तिघांची गोष्ट’, ‘एका क्षणात’ या नाटकांमध्येही त्या चमकल्या होत्या. भरत नाट्य मंदिरात नृत्याच्या कार्यक्रमावेळीच हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले.
मंदार जोशीचित्र-चरित्र