चित्र-चरित्र

संतोष जुवेकर
संतोष जुवेकर
अभिनेता
१२ डिसेंबर १९८४

मराठी सिनेसृष्टीतील अॅक्शन आणि रोमॅण्टिक हिरो म्हणून अभिनेता संतोष जुवेकरची ओळख आहे. विविध सिनेमे आणि मालिकांमधून त्यानं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'बेधुंद मनाची लहर', ‘ह्या गोजिरवाण्या घरात', 'किमयागार' या मालिकांमधून त्याने आपली विशेष छाप पाडली आणि आता ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संतोष जुवेकरने त्यानंतर काही सिनेमे केले, नाटकातही तो चमकला. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित "झेंडा" या चित्रपटातून प्रकाशझोतात आला. ‘मोरया’, ‘मॅटर’, ‘पांगिरा’, ‘एक तारा’, ‘खेळ मांडला’, ‘सनई चौघडे’, ‘बाईकर्स अड्डा’ हे संतोषचे सिनेमे लोकप्रिय ठरले. आज छोट्या पडद्यावर अनेक मालिका गाजताहेत. यामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारात अभिनेता संतोष जुवेकर सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे.

-मंदार जोशीचित्र-चरित्र