चित्र-चरित्र

वैभव मांगले
वैभव मांगले
अभिनेता
२० जून १९७५

टीव्ही मालिका, रंगभूमी आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये सध्या सर्वाधिक व्यग्र असलेला अभिनेता म्हणजे वैभव मांगले. रत्नागिरीमधून पदवीधर झालेला वैभव कलाक्षेत्रात आपली कारकीर्द घडविण्यासाठी मुंबईत आला. ‘झी मराठी’वरील ‘फु बाई फु’ स्कीट्समुळे वैभवला मोठी लोकप्रियता मिळाली. टीव्ही मालिकांमध्ये काम करीत असतानाच वैभवने रंगभूमी आणि चित्रपटांमधील प्रवासही सुरूच ठेवला. ‘लव्ह बेटिंग’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘पोस्ट कार्ड’, ‘चांदी’, ‘टुरिंग टॉकीज’, ‘पिपाणी’, ‘काकस्पर्श’, ‘शाळा’, ‘लहानपण देगा देवा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हे त्याचे काही महत्त्वाचे चित्रपट. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘करून गेलो गाव’, ‘वासूची सासू’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ ही त्याची गाजलेली नाटके. ‘शेजारी शेजारी सख्खे शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमधील त्याचा अनुभव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

'ट्रीपल सीट', 'रंपाट', 'शिकारी', 'देवा', 'बॉईज' हे त्यांचे अलीकडील चित्रपट आहेत.

मांगले यांचे २०२२ मध्ये 'दिल दिमाग और बत्ती', 'शेर शिवराज', 'पावनखिंड', 'धोंडी चंप्या एक प्रेम कथा', 'टाईमपास ३' हे चित्रपट प्रदर्शित झाले.

मंदार जोशी



चित्र-चरित्र