चित्र-चरित्र

रसिका जोशी
रसिका जोशी
अभिनेत्री
१२ सप्टेंबर १९७२ --- ७ जुलै २०११

मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही दर्जेदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून रसिका जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला. रसिका जोशी यांच्या ‘नागमंडल’, ‘व्हाईट लिली आणि नाइट रायडर’ यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. ‘प्रपंच’ या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत ‘खबरदार’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘नाना मामा’, ‘अगं बाई अरेच्चा’अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या. ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटाचे कथा आणि संवाद लेखन त्यांनी केले होते. ‘गायब’, ‘वास्तुशास्त्र’, ‘भूत अंकल’, ‘भुलभुलय्या’, ‘मालामाल वीकली’, ‘जॉनी गद्दार’, ‘बिल्लू बार्बर’, ‘खलबली’, ‘डरना जरूरी है’, ‘एक हसीना थी’, ‘सरकार’ या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही त्यांनी अभिनय केला.
मंदार जोशीचित्र-चरित्र