चित्र-चरित्र

मिताली जगताप
मिताली जगताप
अभिनेत्री
२१ नोव्हेंबर १९७९

मितालीचा जन्म नांदेडचा. परंतु ती वाढली. औरंगाबादमध्ये. इथंच तिचं शालेय नि महाविद्यालयीन शिक्षण झालं. शालेय तसेच महाविद्यालयीन पातळीवरील बऱ्याच एकांकिका आणि नाट्य स्पर्धांमध्ये तिनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. कारकीर्द घडविण्यासाठी ती मुंबईत आली. महेश एलकुंचवार यांच्या ‘प्रतिबिंब’ नाटकाने मितालीला पहिली ओळख मिळवून दिली. ‘राजू’ हा तिचा पहिला चित्रपट. या चित्रपटातील कामगिरीसाठी तिला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ‘आग’, ‘बाबू बॅंड बाजा’, ‘विठ्ठल विठ्ठल’ हे तिचे काही चित्रपट. ‘बाबू बॅंड बाजा’ चित्रपटानं तिला अभिनयासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘वादळवाट’, ‘पिंपळपान’, ‘एक धागा सुखाचा’ या तिच्या काही गाजलेल्या मराठी मालिका. ‘कुसुम’, ‘सीआयडी’, ‘कगार’ हा हिंदी मालिकांमध्येही ती झळकली.

-मंदार जोशीचित्र-चरित्र