चित्र-चरित्र

सुप्रिया पाठारे
सुप्रिया पाठारे
अभिनेत्री
८ एप्रिल १९७२

मराठी रंगभूमी, मालिका तसेच चित्रपट क्षेत्रामधील सर्वपरिचित चेहरा म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रियाचा जन्म मुंबईतील उमरखाडीचा. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड. शाळा तसेच महाविद्यालयीन स्तरावर तिने बऱ्याच नाटकांमध्ये सहभाग घेतला. सातवीत असतानाच तिने एक नाटकही लिहिले होते. कलाक्षेत्रातील कोणीही जवळचे नसतानाही सुप्रियाने स्वत:च्या कलागुणांच्या जोरावर आपली कारकीर्द घडवली. ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकांमध्ये तिचा चांगला जम बसला. ‘बालक पालक’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘दिली सुपारी बायकोची’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘अनोळखी हे घर माझे’ हे तिचे उल्लेखनीय चित्रपट. ‘फू बाई फू’, ‘होणार सूनबाई मी ह्या घरची’, ‘कुलवधू’, ‘पिंजरा’ या तिच्या गाजलेल्या मालिका. 'जागो मोहन प्यारे', 'अस्सं माहेर नको गं बाई' या सुप्रियाच्या अलीकडच्या चांगल्या मालिका.

-मंदार जोशीचित्र-चरित्र