चित्र-चरित्र

पंकज विष्णू
पंकज विष्णू
अभिनेता
८ ऑगस्ट १९८१

पंकज शिक्षणानं इंजिनियर. मुंबईतील ‘व्हीजेटीआय’ या प्रख्यात महाविद्यालयामधून त्यानं अभियांत्रिकीची पदवी घेतली. मात्र कलाक्षेत्राच्या आवडीमुळे तो या क्षेत्राकडे वळला. सुरुवातीच्या काळात त्यानं बरीच वर्ष मालिकांमध्ये कामं केली. ‘दामिनी’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘समांतर’, ‘प्रारब्ध’ या त्याच्या लोकप्रिय मराठी मालिका. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेमधीलही त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘रणांगण’, ‘माझं छान चाललंय ना’, ‘कॉटेज नं. ५२’ या मराठी नाटकांमध्येही त्यानं काम केलं आहे. मालिका, नाटकांबरोबरच मराठी चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. ‘अखंड सौभाग्यवती’, ‘क्रांतीवीर राजगुरु’, ‘जीवापाट’, ‘पाऊलखुणा’, ‘नवरा माझा भवरा’, ‘करूया उद्याची बात’ हे त्याचे मराठी चित्रपट.

पंकजने अलीकडच्या काळात 'शहीद भाई कोतवाल' या मराठी चित्रपटात तसेच 'द बिग बुल' या वेबसीरिजमध्ये आणि 'गुम है किसी के प्यार में' या टीव्ही मालिकेत काम केले आहे.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र