चित्र-चरित्र

संदीप कुलकर्णी
संदीप कुलकर्णी
अभिनेता
१६ नोव्हेंबर १९६४

‘डोंबिवली फास्ट’तील ‘माधव आपटे’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या ‘श्वास’ आणि ‘डोम्बिवली फास्ट’ या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'अवंतिका' मालिकेत त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकारही आहेत. ‘बेधुंद’, 'मी बाप', 'मेड इन चायना ', 'साने गुरुजी', ‘गैर’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला. २००८ मध्ये नायजेरियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुलकर्णी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

'डोंबिवली फास्ट रिटर्न्स', 'कृतांत' हे संदीपचे अलीकडचे चित्रपट. 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसीरिजमधील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.

- संजीव वेलणकर, पुणेचित्र-चरित्र