चित्र-चरित्र

सोनाली खरे
सोनाली खरे
अभिनेत्री
५ डिसेंबर १९८२

सोनाली खरेचं बालपण गेलं ते डोंबिवलीत. महाविद्यालयीन शिक्षण तिनं मुलुंड आणि सोमय्या कॉलेजमधून पूर्ण केलं. गेल्या दोन दशकांपासून ती मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये वावरत आहे. ‘हृदयांतर’, ‘नवरा माझा भवरा’, ‘७ रोशन व्हिला’, ‘चेकमेट’, ‘सावरखेड एक गाव’ हे तिचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘ऊन पाऊस’, ‘बे दुणे दहा’, ‘हम जो कह ना पाये’ आदी मराठी-हिंदी मालिकांमधूनही तिनं काम केलं आहे. नृत्याची आवड असलेल्या सोनालीनं ‘एकापेक्षा एक-अप्सरा आली’ या कार्यक्रमातदेखील भाग घेतला होता.

‘ये रे ये रे पैसा’, ‘जरा हटके’ हे तिचे अलीकडच्या काळातील काही उल्लेखनीय चित्रपट.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र