चित्र-चरित्र

समीर धर्माधिकारी
समीर धर्माधिकारी
अभिनेता
२६ सप्टेंबर १९७८

जाहिरात क्षेत्रामधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करीत हिंदी-मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये मोठं नाव कमावणारा मराठी कलावंत म्हणजे समीर धर्माधिकारी. समीरनं सुरुवातीच्या पुण्यातील रंगभूमीवर काम केलं. त्यानंतर त्यानं मॉडेलिंगकडे आपला मोर्चा वळवला. विमल सुटिंग्ज, आयसीआयसीबॅंक, नेस कॅफे आदी जाहिरातींमध्ये तो झळकला. ‘रेमंड’ या कंपनीसाठी तो ब्रॅंड अॅम्बेसेडरही होता. १९९९ मधील ‘निर्मला मच्छिंद्र कांबळे’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर गेली दोन दशकं तो मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून झळकत आहे. ‘रेस्टॉरंट’, ‘निरोप’, ‘लालबाग परळ’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ हे त्याचे महत्त्वपूर्ण मराठी चित्रपट. ‘सत्ता’, ‘अग्निपथ’, ‘रेनकोट’, ‘रंगरसिया’, ‘प्रेम रतन धन पायो’ आदी हिंदी चित्रपट तसेच ‘बुद्धा’, ‘महाभारत’, ‘बाजीराव पेशवा’, ‘झांसी की रानी’ आदी मालिकांमधूनही तो झळकला आहे.
-मंदार जोशीचित्र-चरित्र