चित्र-चरित्र

सतीश तारे
सतीश तारे
लेखक-अभिनेते-दिग्दर्शक
१९६५ --- ३ जुलै २०१३

मराठी रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट या तीनही माध्यमांवर आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सतीश तारे. श्री. तारे यांना कलाक्षेत्राचे बाळकडू आपले वडील प्रा. जयंत तारे यांच्याकडून मिळाले. ‘फुलराणी’ या बालनाट्याद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ‘सिंदबाद’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’ आदी बालनाट्यांमधील त्यांची कामगिरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लेखन, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन अशी त्यांची चौफेर कामगिरी होती. विनोदाची जाण, हजरजबाबीपणा, अफलातून टायमिंग याच्यामुळे अनेक विनोदी नाटके त्यांनी गाजवली. ‘वासूची सासू’, ‘टुरटूर’, ‘ऑन लाइन क्लियर’, ‘जादू तेरी नजर’, ‘श्यामची मम्मी’, ‘गाढवाचं लग्न’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘फु बाई फू’, ‘घडलंय बिघडलंय’ या मालिकांमधील त्यांची कामगिरी लक्षणीय ठरली. ‘वळू’, ‘बालक पालक’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘एक होता विदूषक’, ‘नाना मामा’, ‘दहावी फ’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. ‘एक चालीस की लास्ट लोकल’ या हिंदी चित्रपटामध्येही ते झळकले होते.
मंदार जोशीचित्र-चरित्र