चित्र-चरित्र

किशोर कदम
किशोर कदम
अभिनेते-गीतकार
९ नोव्हेंबर १९६७

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत एक प्रयोगशील अभिनेता आणि मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या वाटेवरचा गीतकार म्हणून किशोर कदम यांची ओळख आहे. १९९१ मधील ‘आत्मानंद’ हा त्याचा पहिला चित्रपट. विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी १९९९ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘समर’ या चित्रपटामधील अभिनयाद्वारे किशोरनं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तत्पूर्वी बेनेगल यांच्याच ‘मम्मो’ चित्रपटामध्येही त्याचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्यानंतर ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘बेबी’, ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटांमधील किशोरच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. ‘२४’ या हिंदी मालिकेमध्येही किशोर झळकला आहे. १९९५ मधील ‘बनगरवाडी’ चित्रपटामध्ये किशोरचं काम लक्षवेधक ठरलं होतं. ‘प्रतिसाद’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘जोगवा’, ‘वंशवेल’, ‘फॅंड्री’, ‘हायवे’, ‘परतु’, ‘गणवेश’, ‘वाघेऱ्या’ हे त्याचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. बऱ्याच मराठी चित्रपटांसाठी किशोरनं गीतलेखन केलं आहे.
-मंदार जोशीचित्र-चरित्र