चित्र-चरित्र

विनय आपटे
विनय आपटे
अभिनेते-दिग्दर्शक
१७ जून १९५१ --- ७ डिसेंबर २०१३

चित्रपट, नाटक आणि मालिका या तीनही क्षेत्रांमध्ये सहज वावर असणारे अभिनेते-दिग्दर्शक म्हणून विनय आपटे यांचा गौरव केला जायचा. चार दशकांची आपली कारकीर्द आपटे यांनी विविधांगी भूमिका साकारीत तसेच वेगवेगळे विषय दिग्दर्शित करीत गौरवपूर्ण ठरवली. १९७४ साली त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले आणि अत्यंत सरस अशी नाटके केली. नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमांमध्ये ते एकाचवेळी वावरले आणि प्रत्येक माध्यमावर त्यांनी आपला ठसा उमटवला. ‘आक्रोश’, ‘कलियुग’, ‘गांधी’, ‘साथीया’, ‘चांदनी बार’, ‘कॉर्पोरेट’, ‘वीर’, ‘धमाल’ हे त्यांचे काही उल्लेखनीय हिंदी चित्रपट. मराठी चित्रपटातही त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘खबरदार’, ‘आईशप्पथ’, ‘कर्ज कुंकवाचे’, ‘चेकमेट’, ‘लालबाग परळ’, ‘अर्जुन’, ‘हॅलो जयहिंद’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘गुलाबी’ आदी त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘लज्जा’, ‘पारिजात’, ‘अग्निहोत्र’, ‘दुर्वा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘या सुखांनो या’ या मालिकांमधील त्यांचा अभिनय उल्लेखनीय ठरला.
मंदार जोशी



चित्र-चरित्र