चित्र-चरित्र

जयवंत वाडकर
जयवंत वाडकर
अभिनेता
५ जून

मराठी चित्रपट, रंगभूमीवरचे आघाडीचे अभिनेते म्हणून जयवंत वाडकर प्रसिद्ध आहेत. वाडकर यांचे बालपण गेले चिराबाजार येथे. लहानपणी वाडकर यांना क्रिकेटची खूप आवड. त्यातच त्यांना आपली कारकीर्द करायची होती. मात्र कलाक्षेत्रात त्यांनी संधी मिळाली आणि ते येथे मोठे झाले. सिद्धार्थ कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर वाडकर यांची कारकीर्द बहरली. हिंदी-मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवर त्यांनी भरपूर काम केले. एन. चंद्रा दिग्दर्शित तेजाब चित्रपटानं त्यांना घरोघरी पोचवलं. त्यानंतर गेली 30 वर्ष ते अव्याहत काम करीत आहेत. `मी शिवाजीराजे भोसले बोलतोय`, `नवरा माझा नवसाचा`, `पोस्टर गर्ल`, `लाल इश्क`, `एक गाडी बाकी अनाडी`, `हमाल दे धमाल`, `चंगू मंगू`, `नटसम्राट`, `अ वेन्स्डे`, `वेलकम जिंदगी`, `मकबूल` हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, एन. चंद्रा, जॉन मॅथ्यू, विशाल भारद्वाज, महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
मंदार जोशीचित्र-चरित्र