चित्र-चरित्र

विजय पाटकर
विजय पाटकर
अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक
२९ मे १९६१

हरहुन्नरी अभिनेते म्हणून प्रसिद्धीस आलेले विजय पाटकर हे वाढले गिरगावमध्ये. युनियन हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून पदवी घेतली. महाविद्यालयात असतानाच `माझी पहिली चोरी` या एकांकितेत त्यांनी काम केलं. एन. चंद्रा दिग्दर्शित `तेजाब` चित्रपटानं त्यांना मोठं यश मिळालं. अलीकडच्या काळात एक दिग्दर्शक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. जाहिरात, मालिका, नाटक, सिनेमा अशा चारही माध्यमांवर त्यांनी एक अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. ‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘जावईबापू जिंदाबाद’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’, ‘सगळं करून भागले’, ‘लावू का लाथ’ हे पाटकर यांनी दिग्दर्शित केलेले काही महत्त्वाचे चित्रपट. मराठी व हिंदी मिळून तब्बल 150 चित्रपट आणि ३५ नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. `नवरा माझा नवसाचा`, `धमाल`, `सिंघम`, `गोलमाल 3`, `ऑल दि बेस्ट` हे त्यांचे काही महत्त्वाचे चित्रपट. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही काळ ते अध्यक्षही होते. सध्या ते महामंडळाचे संचालक आहेत. ऑस्करच्या निवडसमितीत सदस्य म्हणून काम केले आहे.
मंदार जोशीचित्र-चरित्र