चित्र-चरित्र

नानासाहेब फाटक
नानासाहेब फाटक
अभिनेते
२४ जून १८९९ --- ८ एप्रिल १९७४

मराछी रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते म्हणजे नानासाहेब फाटक. गोपाळ गोविंद फाटक हे त्यांचे मूळ नाव. ‌‘रक्षाबंधन’ या नाटकातून फाटक यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकातील त्यांची ‘गिरीधर’ची भूमिका खूपच गाजली होती. त्यानंतर त्यांनी प्रमुख नायक आणि खलनायक म्हणून अनेक भूमिका केल्या. ‘पुण्यप्रभाव’, ‘श्री’, ‘सोन्याचा कळस’, ‘बेबंदशाही’ ही त्यांची गाजलेली नाटके. मराठी रंगभूमीवर फाटक यांनी साकारलेले ‘नटसम्राट’ हे नाटक इतके गाजले की त्यांच्या नावामागे कायमच ‘नटसम्राट’ ही उपाधीच लावली गेली. शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातील त्यांनी सादर केलेली ‘हॅम्लेट’ची भूमिका आणि ‘राक्षसी कळस’मध्ये त्यांनी केलेली ‘विक्रांत’ची भूमिका विशेष रसिकप्रिय ठरली. १९३४ मधील ‘आकाशवाणी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी तो दिग्दर्शित केला होता. ‘प्रतिभा’, ‘स्वराज्याच्या सीमेवर’, ‘थोरातांची कमळा’, ‘देवाचा कौल’, ‘उमाजी नाईक’ हे त्यांचे इतर काही उल्लेखनीय चित्रपट.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र