चित्र-चरित्र

जनार्दन परब
जनार्दन परब
अभिनेते
१९४५ --- २ एप्रिल २०१६

जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वत:ला झोकून दिलं होत. अनेक हिंदी-मराठी चित्रपटात जनार्दन परब यांनी केलेल्या लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यामध्ये ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला, ‘गंमत जंमत’, ‘कुलस्वामिनी तुळजाभवानी’ हिंदीत ‘कसम’, ‘शिकारी’, ‘ऐलान’, ‘जिद्दी’, ’क्रांतीवीर’, ‘बाजीगर’, ‘नायक’, ‘गुलाम’, ‘उडान’, ‘चायना गेट’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये ‘अवध्य’, ‘नकटीच्या लग्नाला’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘रात्र थोडी सोंगं फार’, ‘काका किशाचा’, ‘संगीत विद्याहरण’, ‘मुद्रा राक्षस’ समावेश असून त्यांनी ‘धुमशान’, ‘नशिबवान धाव खावचो’, ‘कबुतरखाना’सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील केले. प्रख्यात मालवणी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी नाटके आणि मालवणी रंगभूमीचा प्रवास पुढे अविरत सुरू ठेवण्यासाठी जनार्दन परब यांनी प्रयत्न केलेले. नाना पाटेकर यांच्याबरोबर त्यांनी ‘क्रांतिवीर’ चित्रपटामध्ये काम केले होते.

- संजीव वेलणकर



चित्र-चरित्र