चित्र-चरित्र

सायली संजीव
सायली संजीव
अभिनेत्री
३१ जानेवारी १९९३

सायलीची जन्म धुळे येथे झाला. सायली संजीव चांदसारकर हे सायली संजीवचे पूर्ण नाव आहे. सायलीचे शालेय शिक्षण आर जे सी बिटको शाळेत झाले. नाशिकमधील एचपीटी महाविद्यालयातून तिने पदवीचे शिक्षण घेतले. कला शाखेत शिकत असताना सायलीने 'लंगडा मोर' या एकांकिकेत काम केले. यासाठी तिला पारितोषिक मिळाले. राज्यशास्त्राचे शिक्षण घेत असताना मॉडेलिंग व मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. तिने स्वारोवस्की जेम्स, डेंटझ, क्विकर आणि बिर्ला आयकेअरसाठी मॉडेलिंगदेखील केले आहे. सुशांत शेलारसोबत तिला पहिल्यांदा एका व्हिडिओ अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने २०१६ मध्ये चित्रपट आणि टीव्ही शोच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे सायलीला खूप प्रसिद्धी मिळाली. 'काहे दिया परदेस' मालिका २०१६ मध्ये प्रसारित झाली होती. तिचे ४४० भाग प्रसारित झाले. सायलीने राजू पार्सेकर यांच्या 'पोलीस लाइन्स - एक पूर्ण सत्य' या चित्रपटासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामध्ये संतोष जुवेकरने देखील काम केले. याशिवाय त्यांनी आटपाडी नाईट्स, मन फकिरा, एबी अँड सीडी आणि द स्टोरी ऑफ पैठणी, झिम्मा,गोष्ट एका पैठणीची, हे चित्रपटही केले. तेव्हापासून ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. सायलीने ‘9XM झकास’च्या ‘टॉप टेन नायिका’ स्पर्धेतही भाग घेतला होता. सायलीला हिंदी मालिकेतही संधी मिळाली होती. मात्र,तब्येतीच्या कारणामुळे तिला मालिका सोडावी लागली. याशिवाय तिने जाहिरातींमध्येही काम केले आहे. 'यू टर्न' या वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे.सायली संजीवला छोट्या पडद्यावर 'परफेक्ट पाटी', 'गुलमोहर' यांसारख्या शोजमधून खूप यश मिळाले. अलीकडेच त्याने 'शुभमंगल ऑनलाइन' या टीव्ही मालिकेत काम केले आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'बस्ता' या सिनेमात सायली दिसली होती. नुकताच सायलीची 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

सायली संजीव सोशल मिडियावर अॅक्टीव असून अनेक वेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. सध्या टीम इंडियाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड व अभिनेत्री सायली संजीव सोबतच्या रिलेशनशीपची बातमी मीडियामध्ये खूप चर्चेत आली आहे. सध्या सायली तिच्या चित्रपट ‘झिम्मा २’मुळे चर्चेत आहे.

- संजीव वेलणकर



चित्र-चरित्र