चित्र-चरित्र

सुरेश भट
सुरेश भट
कवी, गीतकार
15 एप्रिल 1932 --- 14 मार्च 2003

लोकप्रिय कवी आणि 'गझल सम्राट' या पदवीने ओळखल्या जाणाऱ्या सुरेश भट यांचा जन्म अमरावतीचा. सुरेश भट यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. वडीलही संगीतप्रेमी होते. त्यांनी मुलाची कलेची आवड जोपासली. सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते.1955 मध्ये भट बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी बराच काळ शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी केली. एकाचवेळी अध्यापन आणि कविता लेखन असं काम त्यांचं सुरू राहिलं. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २० एप्रिल १९८४ रोजी झाला होता. त्यावेळी त्यांना हार्मोनियमवर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी साथ केली होती. १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तो ही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत. एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्‍तरंग हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह. घरकुल, सिंहासन, उंबरठा, निवडुंग, आम्ही असू लाडके, मनातल्या मनात आदी चित्रपटांमधील त्यांचं काव्य नि गीते खूप गाजली.चित्र-चरित्र