चित्र-चरित्र

हृषीकेश जोशी
हृषीकेश जोशी
लेखक-अभिनेता-दिग्दर्शक
३ एप्रिल

हृषीकेश मूळचा कोल्हापूरचा. अभिनयाचं त्यानं रीतसर प्रशिक्षण घेतलं ते नवी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून. १९९७ मध्ये त्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात त्यानं बऱ्याच टीव्ही मालिका केल्या. ‘हसा चकटफू’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘घडलंय बिघडलंय’ या मालिकांमधील त्याच्या कामाचं कौतुक झालं. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘यलो’, ‘आजचा दिवस माझा’, ‘देऊळ’, ‘दे धक्का’, ‘पोश्टरगर्ल’, ‘सायकल’, ‘होम स्वीट होम’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘अगं बाई अरेच्चा’ हे त्याचे उल्लेखनीय चित्रपट. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाद्वारे तो २०१८ मध्ये दिग्दर्शकही बनला. हृषीकेशने ‘शोभायात्रा’, ‘लव्हस्टोरी’, ‘ए भाऊ डोकं नको खाऊ’, ‘संगीत लग्नकल्लोळ’, ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आदी नाटकांमध्येही काम केलं आहे. ‘अतिथी तुम कब जाओगे’, ‘कमिने’ या हिंदी चित्रपटांमधूनही तो झळकला आहे.

'भाई व्यक्ती की वल्ली', 'वाघेऱ्या', 'सायकल', 'फिरकी', 'विकून टाक' हे हृषिकेशचे अलीकडच्या काळातील काही चित्रपट. २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात हृषिकेशने दिग्दर्शित केलेले 'मोगरा' हे ऑनलाइन नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले होते.

२०२२ मध्ये ऋषीकेशचा अभिनय असलेले 'भिरकीट', 'जग्गु आणि ज्युलिएट' आणि 'भाऊबळी' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते.

-मंदार जोशीचित्र-चरित्र