चित्र-चरित्र

क्षितीज पटवर्धन
क्षितीज पटवर्धन
कथा-पटकथा-संवाद आणि गीतलेखक
११ जानेवारी १९८५

पटकथा-संवाद आणि गीतलेखन या क्षेत्रात सध्याचा आघाडीचा लेखक म्हणजे क्षितीज पटवर्धन. क्षितीजचा जन्म पुण्याचा. तिथंच त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं. शालेय स्तरावरच क्षितीजनं आपल्या लेखणीतील चमक दाखविली आणि विविध पुरस्कार त्याच्या वाट्याला आले. कम्प्युटर सायन्समधील पदवी घेतल्यानंतरही त्यानं आपलं करियर म्हणून लेखन क्षेत्राला निवडलं. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकामुळे तो पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानं लिहिलेलं ‘दोन स्पेशल’ हे नाटकदेखील गाजलं. विक्रम गोखले यांचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘आघात’ चित्रपटाचं त्यानं लेखन केलं होतं. ‘सतरंगी रे’, ‘टाइमपास २’, ‘लग्न पाहावं करून’, ‘वाय झेड’, ‘फास्टर फेणे’, ‘माऊली’ हे त्याचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. क्षितीजने आतापर्यंत ३० चित्रपटांसाठी ८०हून अधिक गाणी लिहिली आहेत. ‘धागा धागा’ (दगडी चाळ), ‘आवाज वाढव डीजे तुला’ (पोस्टर गर्ल) ही त्याची काही गाजलेली गाणी.

-मंदार जोशीचित्र-चरित्र