चित्र-चरित्र

शर्वरी पिल्ले
शर्वरी पिल्ले
अभिनेत्री
२५ जून १९७३

संजय सूरकर दिग्दर्शित ‘तू तिथं मी’ चित्रपटानं शर्वरी पिल्लेला मोठी लोकप्रियता आणि ओळख मिळवून दिली. मात्र त्यानंतर ती चित्रपटांपेक्षा मालिकांमध्येच अधिक पाहायला मिळआली. ‘दामिनी’, ‘अवंतिका’, ‘तुझं नि माझं घर श्रीमंतांचं’, ‘आंबट गोड’ या तिच्या गाजलेल्या मालिका. शर्वरीने काही मोजकेच मराठी चित्रपट केले असले तरी त्यातील तिच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या ठरल्या. ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘देऊळ’, ‘अ पेईंग घोस्ट’ हे तिचे उल्लेखनीय चित्रपट. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘असेही एकदा व्हावे’ या चित्रपटातही ती झळकली होती. ‘अतिथी तुम कब जाओगे’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट.

'असेही एकदा व्हावे' (चित्रपट) आणि 'मुलगी झाली हो' (टीव्ही मालिका) या तिच्या अलीकडच्या कलाकृती आहेत.

मंदार जोशी



चित्र-चरित्र