चित्र-चरित्र

डॉ. नेहा राजपाल
डॉ. नेहा राजपाल
पार्श्वगायिका-निर्माती
२३ जून १९७८

मराठी चित्रपटांना लाभलेला आजच्या काळातील सुरेल गळा आवाज म्हणजे डॉ. नेहा राजपाल. डोंबिवली येथे जन्मलेल्या नेहा या शिक्षणाने एमबीबीएस डॉक्टर. नवी मुंबई येथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. मात्र कला क्षेत्रामध्ये त्यांनी गेल्या दशकभरात भरपूर काम केले आहे. किराण्या घराण्याच्या गायिका विभावरी बांधवकर यांच्याकडे त्या गाणे शिकल्या. प्रख्यात संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीत दिलेल्या ‘माणूस’ चित्रपटापासून त्यांनी आपल्या पार्श्वगायन कारकीर्दीस सुरुवात केली. ‘फक्त लढ म्हणा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘दे धक्का’, ‘कॅंपस कट्टा’, ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ‘नयी पडोसन’ या हिंदी चित्रपटासाठी त्या शंकर-एहसान-लॉय यांच्याकडे गायल्या. मराठी-हिंदीबरोबरच नेहा यांनी बंगाली, कन्नड, तेलुगु, सिंधी, गुजराती आदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. ‘फोटोकॉपी’ या मराठी चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे.
मंदार जोशीचित्र-चरित्र