चित्र-चरित्र

मृणाल दुसानीस
मृणाल दुसानीस
अभिनेत्री
२० जून १९८८

नाशिकसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन कलाक्षेत्रात झपाट्याने पुढे आलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. शाळा-कॉलेज स्तरावर तिने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी नोंदवली. ‘तू तिथे मी’ मालिकेमुळे ती रातोरात स्टार झाली. ‘माझिया प्रियेला प्रीत कळेना’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या तिच्या गाजलेल्या मालिका. केदार शिंदे दिग्दर्शित ‘श्रीमंत दामोदरपंत’ या चित्रपटामध्ये ती झळकली होती. ‘झी मराठी’वरील ‘एकापेक्षा एक:अप्सरा आली’ या कार्यक्रमाद्वारे मृणालमधील नृत्याचे स्कील प्रेक्षकांमसोर आले होते.

'मन हे बावरे' ही तिची अलीकडील मालिका.

मंदार जोशी



चित्र-चरित्र