चित्र-चरित्र

माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित
अभिनेत्री
१५ मे १९६७

हिंदी चित्रपटसृष्टीतील अलीकडच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चेहरा म्हणजे माधुरी दीक्षित. १९८४च्या ‘अबोध’पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या माधुरीनं त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’ चित्रपटामधील ‘एक दो तीन’ गाण्यामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिनं ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘दिल’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘मृत्यूदंड’, ‘देवदास’ असे उल्लेखनीय चित्रपट केले. यश चोप्रा, संजय लीला भन्साळी, विधू विनोद चोप्रा, सूरज बडजात्या, प्रकाश झा यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर तिनं काम केलं आहे. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर ती काही काळ अमेरिकेत वास्तव्यास होती. भारतात परतल्यानंतर तिनं ‘आजा नच ले’ हा चित्रपट केला. या महिन्यात ती ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. माधुरीचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.चित्र-चरित्र