चित्र-चरित्र

ऊर्मिला कानेटकर
ऊर्मिला कानेटकर
अभिनेत्री
४ मे १९८६

ऊर्मिला कानेटकर-कोठारे
चित्रपट, रंगभूमी आणि टीव्ही अशा तीनही माध्यमामधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून उर्मिलाचा उल्लेख करावा लागेल. पुण्यात जन्मलेली ऊर्मिला कथ्थक नृत्यामध्ये पारंगत आहे. भुवनेश्वर येथे जाऊन तिनं सुजाता महापात्रा यांच्याकडे नृत्याचं शिक्षण घेतलं. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून पदवी घेतल्यानंतर ऊर्मिलानं कला क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. `शुभमंगल सावधान` हा तिचा पहिला मराठी चित्रपट. `मला आई व्हायचंय`, `दुभंग`, `दुनियादारी`, `टाईमपास`, `बावरे प्रेम हे`, `अनवट`, `प्यारवाली लव्हस्टोरी`, `टाईमपास 2`, `गुरू`, `ती सध्या काय करते` हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट. `तुझ्याविना` ही तिची पहिली मालिका. त्यानंतर `असंभव`, `ऊन पाऊस`, `गोष्ट एका लग्नाची`, `वेध` या तिच्या मालिका गाजल्या. `मायका`, `मेरा ससुराल` या हिंदी मालिकांमध्येही ती चमकली. मराठी-हिंदी भाषेच्या पलीकडे मजल मारत तिनं `वेलकम ओबामा` हा तेलुगु चित्रपटदेखील केला. बऱ्याच स्टेज शोमध्ये सूत्रसंचालक म्हणूनही तिनं काम केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे याच्याबरोबर ती २०११ मध्ये विवाहबद्ध झाली.

ऊर्मिला सध्या महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या विविध मालिकांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये व्यग्र असते.

उर्मिलाने २०२२ मध्ये 'एकदा काय झालं' हा चित्रपट तसेच 'रानबाजार', 'अथांग' या वेब सीरिज ₹मध्ये अभिनय केला. २0२३ मधील 'तुझेच मी गात आहे' या मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र