चित्र-चरित्र

शांता आपटे
शांता आपटे
अभिनेत्री, गायिका
१९ मार्च १९२३ --- २४ फेब्रुवारी १९६४

”भारतीय सिनेमांमध्ये सामाजिक, स्त्रीप्रधान असे चित्रपट जेव्हा बनू लागले त्यावेळी अनेक गुणी कलाकार या इंडस्ट्रीला लाभले. त्या काळच्या कलाकारांमध्ये असलेल्या असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करता आलं आणि त्यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले गेले; त्यापैकीच एक नाव होते शांता आपटे. शांता आपटे यांचे वडिल रामचंद्र आपटे रेल्वेत नोकरीला होते; शांता आपटें यांचे शालेय शिक्षण ४ थी पर्यंतचं, त्यानंतर घरीच शिकवण्यासाठी शिक्षक येत, अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या ५ व्या वर्षापासून गायनाचे धडे सुध्दा शांता आपटेंना दिले गेले; पुण्यात असताना बापूराव केतकर यांच्याकडे संगीताचं पहिलं प्रशिक्षण घेतलं; कालांतर त्यांच्या वडिलांची बदली पंढरपूरला झाली त्यामुळे तिथे गायन आणि संगीताचं प्रशिक्षण नारायण बिवा थिटे व मास्टर कृष्णाराव यांच्याकडून घेतले. लहान वयातच शांता आपटेंनी गायनाचे छोटे-मोठे जलसेही करु लागल्या; अश्या या गोड गळ्याच्या गायिकेला रुपेरी पडद्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली. कला तसंच अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर सर्वच गोष्टी अवगत असणं गरजेच्या आहेत; हे माहित असल्यामुळे शांता आपटेंनी ड्रायव्हींग, स्वीमिंग यासारखे प्रकार शिकून घेतले. नृत्यात तर त्या निपुणच होत्या! भालजी पेंढारकरांच्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटातून या सिनेमात शांता आपटेंनी ‘राधा’ ची भूमिका साकारली; त्यानंतरच्या २-३ वर्षात शांताजींनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं व कालांतराने ‘प्रभात’च्या ‘अमृत-मंथन’ , ‘वहॉं’ , ‘राजपुतरमणी’ सारख्या हिंदी चित्रपटातून भूमिका करुन आपल्यातील वैविध्यपूर्ण कलेची चुणूक दाखवून दिली; तसंच ”गोपालाकृष्ण” , ”अमरज्योती” या चित्रपटातील भूमिका सुध्दा प्रचंड गाजल्या; ”कुंकू” चित्रपटानी त्यांच्या अभिनयावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटवली. कारण त्याकाळात बर्लिन फेस्टीव्हल मध्ये शांता आपटेंच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं, आणि कुंकू त्यांच्या कारकीर्दीचा ”माइलस्टोन” ठरला. शांता आपटेंची ओळख बनला; कारण त्यांची कुंकूतील भूमिका त्या काळातल्या एका अतृप्त मनाचा ठाव घेणारी होती जी शांता आपटेंनी हिबेहूब रंगवली. ”कुंकू” आणि ”स्वयंसिध्दा” या चित्रपटात अन्यायाविरोधात पेटून उठनाऱ्याच स्त्रीचं दर्शन शांता आपटेंनी घडवून दिलं. शांता आपटेंचा खाजगी जीवनात वावरसुध्दा अन्याय सहन करायचा नाही आणि वेळ प्रसंगी त्यांनी ते दाखवून देखील दिले. एकदा एका पत्रकाराने शांता आपटें यांच्या विषयी काहीतरी खोटी खरपूस बातमी बनवली, ती बातमी वाचल्यावर त्या खूपच हैराण झाल्या ! आपण ही गोष्ट बोललोच नव्हतो तर त्या पत्रकाराने छापलीच कोणत्या आधारावर? त्याक्षणी अगदी बेधडकपणे शांता आपटे त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेल्या व ही बातमी छापणाऱ्या व पत्रकाराला आपल्या फटक्यांचा प्रसाद द्यायला देखील मागे-पुढे पाहिले नाही. हा प्रसंग म्हणजे एक अपवाद असला तरी खोटेपणाच्या विरोधात केलेला हा मुकाबलाच होता; मिलेट्री माईंडेड असल्याने वेळेचे भान, हजरजबाबीपणा, शिस्तबध्दता, आणि हाती घेतलेलं कार्य वेळच्यावेळी पूर्ण करणे हे गुण अगदी नमुद करण्यासारखेच होते. तसंच एक आई म्हणून शांता आपटे स्वत: आपल्या मुलीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. नाटक आणि शुटिंग्समधून वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करत; इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व ओळखून शांता आपटेंनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले, पण घरात असताना अगदी सक्तीने मराठीतच बोलायचे यावर त्या ठाम असायच्या. शांता आपटेंना हिंदी, मराठी, इंग्रजी सोबतच अनेक भाषा अवगत होत्या; त्यामुळे अनेक प्रादेशिक चित्रपटामध्ये त्यांना भूमिका करता आल्या ज्यामध्ये गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांचा समावेश आहे. त्याकाळी महिलांचा रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरील वावर कमी होता,पण या क्षेत्रात महिलांनी दैदिप्यमान कामगिरी करावी असं त्यांना मनोमन वाटे, आणि म्हणून ऑफस्क्रीन आणि बॅकस्टेज आर्टिस्ट ना शांता आपटेंकडून सतत प्रोत्साहून मिळत असे.

”शांता आपटे” यांचे, ”कुंकू” मधील निरा या त्यांच्या भूमिकेमुळे जाचक परंपरेला विरोध करणारी स्त्री आणि अन्यायाविरुध्द बंड पुकारुन समाजाला सत्मार्गाकडे नेणार्याल स्त्रीची प्रतिमा निर्माण झाली; त्याकाळी अश्या भूमिका साकारुन अजरामर करणं हे मोठं धारिष्ठ्यच होतं आणि शांता आपटेंनी हे लिलया पेललं; १९३१ ते १९५३ या काळात शांता आपटे यांनी रुपेरी पडद्यावर आणि मराठी संगीतरंगभूमीवर साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहिल्या. भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत राहिले आहेत. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण शांता आपटे म्हणजे गायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होता. १९५३ नंतर शांता आपटें यांनी मराठी संगीत रंगभूमीवर ”सौभद्र” , ”मानापमान” , ”लग्नाची बेडी” , ”एकच प्याला” सारख्या नाटकांमधून दर्जेदार भूमिका केल्या, अनेकअंकी असलेल्या या नाटकांसमोर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे मोठे आवाहन असे; म्हणून प्रयोगात सतत नाविन्यपूर्ण भूमिका सादर करण्याची जबाबदारी कलाकारांवर असायची, याच भान शांता आपटेंना असल्याने नेहमीच आपल्या अभिनयाचे वैविध्यमय आविष्कार सादर केले तसंच अनेक जुन्या ‘संगीत’ नाटकांना, पुनर्जीवीत केले, ते म्हणजे त्याकाळातील नामवंत कलाकारांना सोबत घेऊन अर्थात या नाटकांचा पारंपारिक बाज आणि मुळ गाभा मात्र तसाच ठेवला गेला.

एका प्रसंगाचा किस्सा नयना आपटे सांगतात की मुंबईतल्या गोरेगाव परिसरात मोतीलाल नगर या रस्त्याचे उद्घाटन पंडित नेहरुंच्या हस्ते करायचे होते. अभिनेत्री शांता आपटेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी शांता आपटेंना वंदेमातरम गाण्याची विनंती केली. आणि त्यांच्या सुरमधूर स्वरांनी कार्यक्रमाला चार चांद लागले. शांता आपटे यांचे २४ फेब्रुवारी १९६४ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे शांता आपटे यांना आदरांजली.

*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३



चित्र-चरित्र